Home अहमदनगर कारची काच फोडून व्यापाऱ्याचे अडीच लाख लंपास

कारची काच फोडून व्यापाऱ्याचे अडीच लाख लंपास

Ahmednagar theft trader by breaking the glass of the car

अहमदनगर | Ahmednagar: शहरातील एका कांदा व्यापाऱ्याचे बँकेतून काढलेले पैसे कारची काच फोडून अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, शहरामधील कांदा व्यापारी गणेश लक्ष्मणराव ताठे यांनी कामानिमित्त मार्केट परिसरातील बँकमधून अडीच लाख रुपये काढले. ती रक्कम एका पिशवीत ठेवण्यात आली. ती पिशवी त्यांनी त्यांच्या डस्टर या कारमध्ये मागील सीटवर ठेवली. ते लालटाकी परिसरातील सुदर्शन निवास येथे गेले असता त्यांनी गाडी पार्किंग मध्ये उभी करून कामानिमित्त गेले.

या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी भर दुपारच्या सुमारास कारची काच फोडून पिशवीत ठेवलेले अडीच लाख रुपयांची रक्कम पिशवीसह लंपास केली.  याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गणेश ताठे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोसई शेळके हे करीत आहे.

Web Title: Ahmednagar theft trader by breaking the glass of the car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here