Home अहमदनगर धक्क्कादायक: विवाहित महिलेवर भरदिवसा घरात घुसून अत्याचार

धक्क्कादायक: विवाहित महिलेवर भरदिवसा घरात घुसून अत्याचार

Shrigonda married woman was tortured by breaking into a house all-day

श्रीगोंदा | Shrigonda: एक विवाहित तरुणी आपल्या घरात लहान मुलीस झोपी लावून घरात बसलेली असताना एका ५० वर्षीय नराधमाने घरात जाऊन दरवाजा लावून घेत धमकी देत बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.

सदर प्रकार कोणाला सांगितल्यास आई वडिलांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपीचा साथीदार व त्याच्या पत्नीचा देखील समावेश आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील एक विवाहित तरुणी आपल्या लहान मुलीस झोपी लावून घरात बसली होती. याचदरम्यान रावसाहेब धोंडीबा घेडगे या नराधमाने घरात घुसून आतून दरवाजा लावून बळजबरीने तिच्या इच्छा नसताना अत्याचार केला. तिने प्रतिकार केला असता धमकी देण्यात आली. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास तुझ्या आई वडिलांना जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.

यानंतर घेडगे याचा साथीदार रवी भास्कर दिवटे व घेडगेची पत्नी शोभा घेडगे यांनी तरुणीला हा प्रकार कोणाला सांगू नकोस आमची बदनामी करू नको अशी धमकी दिली.

याप्रकरणी विवाहित तरुणीने बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रावसाहेब धोंडीबा घेडगे यास ताब्यात घेण्यात आले आहे. दोघे जण फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. डीवायएसपी जाधव व पोलीस निरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

  Web Title: Shrigonda married woman was tortured by breaking into a house all-day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here