Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: ट्रक चालकाला कार चालकाने लुटले

अहमदनगर ब्रेकिंग: ट्रक चालकाला कार चालकाने लुटले

Ahmednagar Theft truck driver was robbed by the car driver

अहमदनगर | Ahmednagar Theft: शहरातील केडगाव बायपास चौकातून जळगाव येथे जात असताना एका कार चालकाने ट्रक चालकाच्या हातातील पाच हजार रूपये रोख व मोबाईल फोन चोरून (Theft) नेल्याची घटना सोमवारी पहाटे दोन वाजता घडली.

याबाबत यशवंत भारत पवार (वय 23 रा. वडगाव मावळ, जि. पुणे, मूळ रा. परभणी) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पुणे जिल्ह्यातील उर्से येथील गंगा पेपर मिलमधून पेपर रोल भरून जळगावला जात असताना केडगाव बायपास चौकाजवळील आनंद हॉटेलजवळ ट्रकच्या डाव्या बाजूने एक स्विफ्ट कार गाडीला घासली.

स्विफ्ट चालकाने गाडी आडवी लावून नुकसान भरपाई मागितली. ट्रक ड्रायव्हर खिशातून पैसे काढून दोन हजार रूपये कार चालकाला देत असताना त्याने ड्रायव्हरच्या हातातून पाच हजार रूपये बळजबरीने हिसकाऊन घेतले व मोबाईल घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Ahmednagar Theft truck driver was robbed by the car driver

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here