Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: घरात घुसून महिलेचा विनयभंग, पुरूषाचे केले अपहरण

अहमदनगर ब्रेकिंग: घरात घुसून महिलेचा विनयभंग, पुरूषाचे केले अपहरण

Breaking into a house, molesting a woman, abducting a man

अहमदनगर | Ahmednagar Crime: घरात घुसून महिलांचा विनयभंग (molesting a woman) करीत घरातील पुरूषाचे अपहरण (abducting) केल्याची घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पाच जणांविरूध्द अपहरण, मारहाण, विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग झालेल्या पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार  प्रमोद एकनाथ गोरे, विनोद एकनाथ गोरे, प्रमोदचा मेव्हणा सचिन अनभुले व त्यांच्या सोबत दोन अनोळखी व्यक्ती विरूध्द हा गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रमोद, विनोद, सचिन व दोन अनोळखी फिर्यादीच्या घरात घुसले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या जावासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

फिर्यादीची सासुला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केले. तलवारीने तुकडे करून टाकु, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या पतीला संमतीशिवाय बळजबरीने अज्ञात कारणासाठी अज्ञात ठिकाणी घेऊन गेले असल्याचे, फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत.

Web Title: Breaking into a house, molesting a woman, abducting a man

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here