Home अहमदनगर युवासेनेच्या शहरप्रमुखासह तिघांना खंडणी प्रकरणी अटक

युवासेनेच्या शहरप्रमुखासह तिघांना खंडणी प्रकरणी अटक

Ahmednagar Three arrested in ransom case

नगर | Ahmednagar: व्यापाऱ्याला धमकावून खंडणी मागितल्याच्या आरोपावरून शिवसेनेचा युवासेनेचा शहरपप्रमुख हर्षवर्धन कोतकर याच्यासह तिघांना नगर पोलिसांनी अटक केली आहे.

या तिघानाही न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हर्षवर्धन महादेव कोतकर रा. केडगाव नगर, अक्षय दिलीप कोके रा. अक्षदा गार्डनजवळ नगर, राजेंद्र गोरख रासकर रा. चास नगर या तिघांना अटक करण्यात आली आहे.

 नगर शहराजवळ बाजारसमितीच्या नेप्ती उपबाजार समितीमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी कांदा व्यापारी महेश जवाहरलाल भराडीया रा. वांबोरी ता. राहुरी याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, कांदा व्यापारी महेश भराडीया यांचा अन्य व्यक्तीबरोबर पूर्वी जागेचा व्यवहार झाला होता. परंतु या व्यवहारात तू आम्हाला २० हजार रुपये दे अन्यथा ठार मारू धमकी हर्षवर्धन कोतकर व अक्षय कोके यांनी भराडीया यांना देत होते. त्यांनी नगर पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. गुरुवारी दुपारी भाराडीया यांना धमकीचा फोन आला. त्यांनी नगर तालुका पोलिसांचे लक्ष वेधले. पोलिसांनी भराडीया यांच्या गाळ्याभोवती सध्या वेश्यातील पोलीस तैनात केले. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांच्याकडे अक्षय कोके व राजेंद्र रासकर पैसे मागण्यासाठी गेले. तेथून कोके याने हर्षवर्धानला फोन लावून भराडीयाकडे दिला. फोनवरून पैसे कोके यांना देण्यास सांगितले. कोके व रासकर यांनी पैसे स्वीकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावरून रात्री हर्षवर्धन याला केडगावमधून अटक केली.

Web Title: Ahmednagar Three arrested in ransom case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here