Home अहमदनगर बसमध्ये एक वृद्ध बसला मात्र बसमधून उतरतेवेळी वृद्धाचा मृत्यू

बसमध्ये एक वृद्ध बसला मात्र बसमधून उतरतेवेळी वृद्धाचा मृत्यू

Jamkhed old man died while getting off the bus

जामखेड | Jamkhed: बारामतीहून भूमकडे जाणारी बसमध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

बारामतीहून भूम येथे जाणारी बस (एम.एच.१४ बी.टी. १५७७) जामखेड मार्गे जात असताना शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास खडकत ता. आष्टी येथे आली असता एक वृद्ध व्यक्ती बसमध्ये चढला तो जामखेड तालुक्यातील पाटोदा(गरड) येथे उतरणार होता. चालकाने गाडी थांबविली असता वाहकाने त्यांना आवाज दिला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने वाहक त्याच्या सीटजवळ गेला असता त्याच्या तोंडाला फेस आल्याचे दिसून आले.

सदर बस चालकाने राजाराम नागरगोजे आणि वाहन चालक चैतन्य फटाले यांनी पाटोदा सरपंचाना बोलावून घेतले सदर व्यक्तीला ओळखता का असे विचारले असता त्याने हा आमचा गावचा माणूस नाही असे सांगितले.यामुळे सदर बस चालकाने सरळ जामखेड पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी त्या वृद्ध व्यक्तीला जामखेड रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक सहीने यांनी त्यांस मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस करीत आहेत. या वृद्धाची ओळख पटलेली नसून जर या व्यक्तीस कोणी ओळखत असेल तर जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.  

Web Title: Jamkhed old man died while getting off the bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here