Sangamner: संगमनेर तालुक्यात घरफोडी, दुकान फोडले
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील साकुर येथे चोरट्यांनी दुकान फोडले. यामध्ये २६ हजार ४०० रुपयांचे कपडे लंपास केल्याचे घटना ४ ते ५ फेब्रुवारी दरम्यान घडली. याप्रकरणी भाऊसाहेब डोमाळे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संगमनेर तालुक्यात पिंपळे येथे घरफोडी करण्यात आली आहे. यामध्ये ३० हजार रुपयांचे दागिने व ५० हजार रोकड असा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात रभा चकोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक जाधव हे करीत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री रस्त्यावरील हातवळ येथे ५ फेब्रुवारी रोजी चोरट्यांनी घरफोडी करून १ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केला आहे.
जामखेड तालुक्यातील पाडळी येथे घरातून चोरट्यांनी १० हजार रुपये चोरून नेल्याची घटना ५ फेब्रुवारीला घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Sangamner taluka theft incidents