Home अहमदनगर अहमदनगर पाऊस! आज पुन्हा यलो अलर्ट – Rain Alert

अहमदनगर पाऊस! आज पुन्हा यलो अलर्ट – Rain Alert

Ahmednagar rain Alert: पावसाने अगोदरच थैमान घातलेले असताना आज पुन्हा पावसाचा मुक्काम वाढला आहे.

Ahmednagar Today Rain yellow Alert

अहमदनगर:  जिल्ह्यातील पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. शेतकरी पुरता हैराण झाला आहे अशातच भारतीय हवामान खात्याने आज बुधवारी (दि.19) जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री उशीरा नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागाला ढगाच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झोडपून काढले. यामुळे खरीप हंगामात आलेल्या पिकांचे आणखी नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात जूनपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून कृषी विभागाकडून त्यांचे पंचनामे करण्यात आले असून दोन दिवसांत नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येणार आहे. त्यानंतर ती शासनाला सादर करून भरपाईची मागणी करण्यात येणार आहे.

दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 550 मिली मीटरच्या जवळपास सरासरीच्या 128 टक्के पाऊस झालेला आहे. सोमवारी रात्री जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात असणार्‍या 97 महसूल मंडलांपैकी 56 महसूल मंडलात मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुन्हा आज जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.

Web Title: Ahmednagar Today Rain yellow Alert

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here