Home Accident News Accident: चारचाकी व दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

Accident: चारचाकी व दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

Ahmednagar Accident:  कट मारल्याने दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने अपघातात दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना.

Death of a youth in a four-wheeler and two-wheeler accident

अहमदनगर: चार चाकीला दुचाकीने कट मारल्याने दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने अपघातात दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. . नगर-मनमाड रोडवरील सावेडी बस स्थानकाजवळ हा अपघात झाला.

स्वप्निल अंबादास तोडमल (वय 20 रा. बहिरोबा मळा, इमामपूर ता. नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास भाऊराव तोडमल (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा स्वप्निल तोडमल हा फोटो ग्राफीचा कामासाठी नगर येथे आला होता. तो दुचाकीवरून जात असताना त्याच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने कट मारला. यामुळे त्याची दुचाकी डिव्हायडरला जाऊन धडकली. या धडकेत स्वप्निल याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Death of a youth in a four-wheeler and two-wheeler accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here