अहमदनगर: विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
Ahmednagar | Shrirampur: पोल्ट्री शेडचे काम करत असताना विजेचा धक्का (Electric Shock).
श्रीरामपूर: शिक्षणसेवक म्हणून काम केलेले व नंतर शेड बांधण्याचा व्यवसाय सुरु केला होता. श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे पोल्ट्री शेडचे काम करत असताना विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झालेल्या खोकर येथील बबन वंजारे (वय 36) या तरुणाचा मृत्यू झाला.
खोकर शिवारातील सुरेश लोखंडे यांच्या शेतात पोल्ट्री शेडचे काम सुरू होते. हे काम करीत असताना येथे शेडचे काम करणारा मुख्य कारागीर बबन वंजारे शेडवर चढून काम करीत होता. या शेडवरून खोकर एजी या 11 केव्ही वीज वाहक तारा गेलेल्या आहेत. या तारांमुळे विजेचा धक्का बसून बबन गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.काँ. अर्जुन बाबर करत आहेत. दरम्यान महावितरणचे कनिष्ठ अभियंता वैभव निकम व मदतनिस सुरेश पवार यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
अहमदनगर येथील प्लम्बर मनोज वंजारे व वसई येथील बाळासाहेब वंजारे यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात वृद्ध आजी, आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, दोन लहान भाऊ असा परीवार आहे.
Web Title: Youth dies due to electric shock