Home संगमनेर संगमनेर तालुक्यात महिला पोलिसाची आत्महत्या- Suicide

संगमनेर तालुक्यात महिला पोलिसाची आत्महत्या- Suicide

Sangamner Suicide:  तळेगाव दिघे येथील घटना ; महिला पोलिसाच्या आत्महत्येच्या घटनेने पंचक्रोशीत खळबळ.

Female policewoman commits suicide in Sangamner taluka

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील खोकराळे वस्ती या ठिकाणी एका पोलीस महिलेने माहेरी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. लता गोरख खोकराळे (वय २९ वर्षे ) असे आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे. मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस महिलेच्या आत्महत्येच्या या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी लता गोरख खोकराळे ( वय २९ वर्षे ) ही विवाहित महिला शिर्डी पोलीस ठाण्यास नियुक्ती होती. मात्र, सध्या ती रजेवर होती आणि तळेगाव दिघे येथे माहेरी आई-वडिलांकडे राहत होती. दरम्यान मंगळवारी (दि. १८) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरात कुणीही नव्हते. पोलिस असलेल्या लता खोकराळे हिने पत्र्याच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

Web Title: Female policewoman commits suicide in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here