Home अहमदनगर बनावट एटीएम कार्ड बनवून पैसे काढणाऱ्या दोघांना अटक

बनावट एटीएम कार्ड बनवून पैसे काढणाऱ्या दोघांना अटक

ahmednagar two arrested for making fake atm cards

अहमदनगर | Ahmednagar: बँकाच्या  एटीएम कार्डचे क्लोन बनवून त्याआधारे बँकाच्या एटीएममधून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर क्राईम व भिंगार पोलिसांनी ठाणे येथून अटक केली आहे. यामधील एक आरोपी अजून पसार आहे.

यातील अटक केलेल्या दोघांकडून ३० बँकाचे एटीएम जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे या टोळीने अनेकांना गंडा घातला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

धीरज अनिल मिश्रा वय ३३ व सुरज अनिल मिश्रा वय २२ रा. दोघेही नायगाव मुंबई अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना १९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालायात दिला आहे. यातील तिसरा आरोपी सुजितसिंग हा फरार झाला आहे. ही टोळी मुंबईतील एका केंद्रातून एटीएम कार्डचे क्लोन तयार करण्याचे काम करीत होती.

धीरज व सुरज हे दोघे पूर्वी अरणगाव ता. नगर येथील पेट्रोल पंपावर काम करीत होते. तेथे पेट्रोल भरण्यासाठी आलेले जे ग्राहक एटीएम कार्ड चा वापर करीत होते. त्यांच्याकडून माहिती घेऊन त्याआधारे बनावट एटीएम कार्ड बनवत होते. या बनावट एटीएम कार्डच्या माध्यमातून नगर शहरातील एकाच्या भिंगारमधील अर्बन बँकेच्या एटीएममधून २० हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी भिंगार पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.  

भिंगारचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख व सायबर क्राईम सेलचे उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांच्या पथकाने तपास केला. नगर शहरातील विविध बँकाच्या एटीएम ठिकाणाचे सीसी टीव्ही फुटेज तपासणी करून आरोपी निष्पन्न झाले. हे आरोपी कल्याण रस्त्याने ठाण्याकडे जात असल्याचे आढळले होते. त्यांचा पाठलाग करून ठाण्याजवळील टेकावडे गावाजवळ दोघांना अटक करण्यात आली.  

Web Title: ahmednagar two arrested for making fake atm cards

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here