Home Accident News अहमदनगर: दोन माल ट्रकचा अपघात, एकाचा मृत्यू

अहमदनगर: दोन माल ट्रकचा अपघात, एकाचा मृत्यू

Ahmednagar Accident:  दोन मालट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना.

Ahmednagar Two goods trucks crash Accident, one dead

अहमदनगर:  दोन मालट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर-दौंड मार्गावर हिवरे झरे (ता. नगर) गावाजवळ ही घडली. या अपघातात समाधान पोपट पगार (वय 39 रा. खुंटेवाडी, ता. देवळा, जि. नाशिक) हा ट्रक चालक मयत झाला आहे.

याबाबत दिलीप गणेश तांबे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुसर्‍या ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पसार झाला आहे. हिवरे झरे गावाजवळ बस स्थानका शेजारील एका दुकानासमोर हा अपघात झाला.

समाधान पगार हा मालट्रक घेऊन दौंडकडून नगरच्या दिशेने येत असताना नगरहून दौंडकडे येणार्‍या मालट्रकने दुसर्‍या ट्रकला समोरून कट मारताना एका बाजूला धडक दिली. त्यामुळे पगार यांचा ट्रक रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला जाऊन धडकला. यामध्ये समाधान पोपट पगार हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Ahmednagar Two goods trucks crash Accident, one dead

Also See: Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here