Home औरंगाबाद दोन चिमुकल्यांचा आईनेच घोटला गळा

दोन चिमुकल्यांचा आईनेच घोटला गळा

Aurangabad Crime News: सहा वर्षांची मुलगी आणि चार वर्षांच्या मुलाचे नाक-तोंड दाबून खून (Murder) केल्याच्या घटनेचा उलगडा.

Murder Case mother strangled the two little ones

औरंगाबाद : सादातनगर येथील सहा वर्षांची मुलगी आणि चार वर्षांच्या मुलाचे नाक-तोंड दाबून खून केल्याची घटना उघडकीस आला पोलीस तपासात ही घटना उघडकीस आली आहे. घटनेचा उलगडा सोमवारी मध्यरात्रीनंतर झाला. दोन्ही मुलांचा खून आईनेच केल्याचे स्पष्ट झाले. चुलत्याने दिलेल्या तक्रारीवरून आई आलिया फहाद बसरावी (२२) हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुलगी अदिबा फहाद बसरावी (६) व अली फहाद बसरावी (४) या चिमुकल्याचा राहत्या घरीच सोमवारी दुपारी मृत्यू झाला. दोघांचा मृत्यू नाक-तोंड दाबल्यामुळे झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाल्यानंतर, पोलिसांनी चौकशीसाठी आईला रात्री उशिरा ताब्यात घेतले होते. त्यावेळी तिने मुलांच्या खुनाची कबुली दिली. पोटच्या दोन्ही मुलांचा गळा कशामुळे घोटला, याचे गूढ मात्र अद्यापही कायम आहे.

आलियाचा सहा महिन्यांपूर्वी गर्भपात झाला होता. तेव्हापासून तिची मानसिक स्थिती ठिक नव्हती. वयाच्या १ ५व्या वर्षीच तिचे लग्न झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Murder Case mother strangled the two little ones

Also See: Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here