Home अहमदनगर अहमदनगरच्या तापमानात घट, तर येणारे पुढील दोन आठवडे….

अहमदनगरच्या तापमानात घट, तर येणारे पुढील दोन आठवडे….

Ahmednagar Weather alert:  अहमदनगर जिल्ह्यात वातावरण कुल कुल झाले असून नवीन वर्षात हूडहुडी भरणारी थंडी जाणवू लागली आहे. तसेच येणारे पुढील दोन आठवडे हुडीहुडी कायम राहणार असल्याचे हवामान तज्ञांचे मत आहे.

Ahmednagar Weather alert temperature will drop, though, for the next two weeks

अहमदनगर: गेल्या दोन दिवसांपासून नगरच्या किमान तापमानात घट झाली असून थंडीमुळे नगरकरांना हुडहुडी भरलेली आहे. बुधवारी तर दिवसा आणि रात्रीही थंडी होती. तसेच जोडीला कमालीचा गार वारा होता. अधूनमधून आभाळ आलेले होते. त्यामुळे स्वेटर्स, कानटोप्या, घोंगड्या, ब्लँकेट्सची आता गरज भासू लागली आहे. या थंडीमुळे जनजीवनावरही परिणाम झाला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याचं आठवड्यात राज्यात हुडहुडी भरणारी थंडी जाणवली. हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तरी येणारे पुढील दोन आठवडे थंडीचा जोर कायम असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 32.1 (12.5), जळगाव 29 (9.8), धुळे 28 (7.8), कोल्हापूर 30.6 (19.5), महाबळेश्वर 28.7 (14.1), नाशिक 30.2 (10.6), निफाड 27.4 (8.4), सांगली 31 (18.1), सातारा 31.6 (14.9), सोलापूर 33.7 (20.1), सांताक्रूझ 32.4 (16.6), डहाणू 28.3 (16), रत्नागिरी 31.7 (19.1), औरंगाबाद 30 (10.6), नांदेड 30.8 (17.8), उस्मानाबाद – (15), परभणी 30.7(17), अकोला 30.8 (14.9), अमरावती 31 (14.03), बुलडाणा 29 (14.5), ब्रह्मपुरी 29.8 (15.2), चंद्रपूर 28.2 (17.4), गडचिरोली 29 (13), गोंदिया 28 (12.1), नागपूर 28.4 (13.2), वर्धा 28.2 (14.5), यवतमाळ 28.5 (16.0).

Web Title: Ahmednagar Weather alert temperature will drop, though, for the next two weeks

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here