Home अहमदनगर अहमदनगरकर गारठले! तापमानाचा पारा घसरला, ४८ तासांत अधिक हूडहुडीची शक्यता

अहमदनगरकर गारठले! तापमानाचा पारा घसरला, ४८ तासांत अधिक हूडहुडीची शक्यता

Ahmednagar weather Update: राज्यात तसेच अहमदनगरमध्ये तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन.

Ahmednagar weather Update Temperatures drop, more thunderstorms likely in 48 hours

अहमदनगर | Ahmednagar News: दोन आठवड्यापूर्वी गायब झालेल्या थंडीचे पुनरागमन झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा ८.१ अंशांपर्यंत घसरल्याने जिल्हा गारठला आहे. पुढील ४८ तासांत अहमदनगरसह राज्याच्या विविध भागात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवाळीनंतर आठवडाभर वातावरणात गारवा होता, त्यानंतर वातावरणात बदल होऊन पहाटे थंडी व दिवसा उष्णता असे चित्र होते. ( weather Update )

मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान असल्याने, थंडी गायब झाली होती. त्याचा परिणाम पिकांवर झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी ३ जानेवारीला किमान तापमान १३.६ अंशापर्यंत घसरले होते. त्यानंतर ७ जानेवारीला पुन्हा तापमानाचा पारा १७ अंशावर गेल्याने थंडी कमी झाली. परंतु, सोमवारपासून (९ जानेवारी) पुन्हा एकदा वातावरणात गारवा वाढला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार सोमवारी नगरमध्ये कमाल २७.३ ते किमान ८.५ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला. तापमान दहा अंशाच्या खाली घसरले असून सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानात किंचीत वाढ होऊन २८ अंश सेल्सिअस राहिले, परंतु किमान तापमान ८.५ अंश आहे. राहुरीत कमाल तापमान २८.२ तर किमान ८.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. पुढील ४८ तासांत तापमानाचा पारा अधिक घसरण्याची शक्यता आहे.

राज्याची हवामानाची स्थिती:

भंडारा कमाल ३०.६ ते किमान ७.६, बुलढाणा २७.२ ते ८, चंद्रपूर २९.१ ते ७.५, गोंदीया ३१ ते ८.५, नाशिक २९.७ ते ८, पुणे २७.४ ते ७.१, सोलापूर ३०.३ ते ७ तर औरंगाबाद २९.१ ते १४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागात झाली आहे. पुढील पाच दिवसांत राज्यात विविध भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्हा तापमान:

जिल्ह्यात अहमदनगर, कोपरगाव व राहुरी तालुक्यातील तापमान्य नंदी हवामान विभागाच्या (भारतीय माैसम विज्ञान विभाग) संकेत स्थळावर आहेत. त्यानुसार अहमदनगरमध्ये कमाल २८ अंश तर किमान ८.५ अंश सेल्सिअस, कोपरगाव कमाल २८, किमान १०.३ तर राहुरी – कमाल २८.२ किमान ८.१ अंश नोंदवला गेला.

थंडीत आरोग्याची काळजी घ्या

उबदार कपड्यांचा वापर करून, शरीर कोरडे ठेवावे. शरिरातील उष्णता कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. थरकाप होत असेल तर दुर्लक्ष करू नये, काळजी न घेतल्यास हायपोथरमियाचा धोका आहे. प्रकृती खालावल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी केले.

Web Title: Ahmednagar weather Update Temperatures drop, more thunderstorms likely in 48 hours

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here