तु माझ्या नवऱ्याला फोन का करतेस असे म्हणून घडले असे काही
Ahmednagar | अहमदनगर: महिलेला मारहाण करत विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया भंडारी व पंकज भंडारी समता कॉलनी विनायकनगर अशी आरोपींची नावे आहेत.
पिडीत महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. सोमवारी सदर घटना घडली. फिर्यादी महिला सोमवारी श्रमिक कार्ड बनविण्यासाठी जात असताना जया भंडारी त्यांना त्यांना भेटली. व म्हणाली. तु माझ्या नवऱ्याला फोन का करतेस असे म्हणून शिवीगाळ केली. यानंतर फिर्यादी व त्यांचे पती जयाला जाब विचारण्यासाठी गेले असता जयाने फिर्यादी व त्यांच्या पतीला मारहाण केली. पंकज हा तिथे आला त्याने फिर्यादीला शिवीगाळ करीत विनयभंग केला. भांडणात फिर्यादीच्या गळ्यातील पोत गहाळ झाली.
Web Title: Ahmednagar Woman molestation Case