Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: पोलीस कर्मचारी निवासस्थानाजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर ब्रेकिंग: पोलीस कर्मचारी निवासस्थानाजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

Dead body near police personnel residence

Ahmednagar | लोणी | Loni:  लोणी येथील कोल्हार रस्त्यालगतच्या पोलीस कर्मचारी निवासस्थानाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मात्र त्याची काही वेळातच ओळख पटली. अंदाजे 30 ते 32 वर्षे वयाच्या इसमाचा मृतदेह मंगळवारी आढळून आला. पोलीस वसाहती जवळच गणेश दिघे यांचे राहते घर असून मयत इसम त्यांच्याकडे शेतीकामासाठी आला होता.

त्याचे नाव हरिदास सावजी चौधरी असून तो कपराडा, गुजरात येथील रहिवासी आहे. तो परिवारासह लोणीत आला होता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Dead body near police personnel residence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here