Home अहमदनगर अहमदनगर खळबळजनक बातमी! सख्ख्या भावाने डोक्यात कुर्‍हाड घालून केली भावाची हत्या- Murder...

अहमदनगर खळबळजनक बातमी! सख्ख्या भावाने डोक्यात कुर्‍हाड घालून केली भावाची हत्या- Murder Case

brother murder his brother by putting an ax in his head

Ahmednagar | राहुरी  | Rahuri:  नेहमीच दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करून त्रास देणार्‍या भावाच्या डोक्यात सख्ख्या भावाने कुर्‍हाड घालून हत्या (Murder) केल्याची घटना राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथे घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे.

राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथे मंगळवार दिनांक 17 मे रोजी पहाटे दोन वाजता अमोल अरुण लोखंडे याने आपला सख्खा भाऊ राहुल अरुण लोखंडे, वय 25 वर्षे याच्या डोक्यात कुर्‍हाड घालून खून केल्याची घटना घडली आहे.

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पिंपळगाव फुणगीचे पोलीस पाटील संजय फुणगे यांनी राहुरी पोलिसात अमोल लोखंडे याच्या विरोधात 302 प्रमाणे खुणाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनेच्या ठिकाणी मध्यरात्री पोलीस पथकाने भेट देऊन आरोपीस अटक केली आहे.

मयत राहुल अरुण लोखंडे हा नेहमीच दारुच्या नशेत त्याच्या घरच्या लोकांना शिवीगाळ करुन मारहाण करत असे. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळुन त्यास त्याचा मोठा भाऊ अमोल याने वैतागून कुर्‍हाडीने डोक्यात घाव घालुन जिवे ठार मारले. पोलीस पाटील फुणगे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास राहुरी पोलीस करीत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: brother murder his brother by putting an ax in his head

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here