Home अहमदनगर अहमदनगर: लहान मुलांना वडापाव आणण्यास पाठविले अन घरात घुसून महिलेवर अत्याचार

अहमदनगर: लहान मुलांना वडापाव आणण्यास पाठविले अन घरात घुसून महिलेवर अत्याचार

Ahmednagar News:  घरात घुसून महिलेवर बळजबरीने अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Ahmednagar woman was Rape by entering the house

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील सहा महिन्यापूर्वी दिवसा घरात घुसून अत्याचार केल्याची तक्रार ३० वर्षीय महिलेने राहुरी पोलिसात दिली असून त्या तरुणा विरोधात राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सहा महिन्यापूर्वी झालेल्या या घटनेत आरोपीने बदनामी करण्याच्या भीतीपोटी पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली नव्हती.

परंतु या घटनेमुळे या परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, पीडित महिला दिनांक ६  नोव्हेंबर 2022 रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी संदीप वाकचौरे राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी यांनी फिर्यादीच्या घरी येऊन म्हणाला की, मी तुझ्या नवर्‍याचा मित्र आहे व त्याने लहान मुलांसाठी वडापाव पाठविले आहेत. असे म्हणून त्या पीडित महिलेच्या घरात घुसून संदीप वाकचौरे याने फिर्यादीचे इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध करून फिर्यादीला दमबाजी केली की, जर तू हा प्रकार कोणाला सांगितलंस तर, तुझी व तुझ्या नवर्‍याची बदनामी संपूर्ण गावात करील, अशी धमकी पीडित महिलेला वाकचौरे यांनी दिली.

पीडित महिलेच्या राहुरी पोलीस स्टेशनला दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी गु. र. न.377/2023 भादवि कलम 376, 452,506 प्रमाणे आरोपी वाकचौरे वर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास राहुरीचे पोलीस करीत आहेत.

Web Title: Ahmednagar woman was Rape by entering the house

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here