Home क्राईम नात्‍यातील मुलगा घरी आला अन्‌ केले घृणास्‍पद कृत्‍य; पीडिता दोन महिन्याची गर्भवती

नात्‍यातील मुलगा घरी आला अन्‌ केले घृणास्‍पद कृत्‍य; पीडिता दोन महिन्याची गर्भवती

Beed Crime: १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्राचे आमिष दाखवून अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना.

Rape of a minor girl by luring her

बीड: बीडच्‍या अंबाजोगाई शहरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्राचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या परिवाराच्‍या नात्यातील पुणे येथील युवक घरी आला व त्‍याची ओळख मुलीशी झाली. त्यातून त्‍याने मुलीला लग्न करण्याचे आश्वासन दिले. दरम्‍यान घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत त्‍याने अत्याचार केला. ऋषी असे आरोपीचे नावं आहे. त्याचा शोध सुरु असून अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकार समोर आल्‍यानंतर मुलीची तपासणी केली. यात पीडित मुलगी ही दोन महिन्याची गर्भवती असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rape of a minor girl by luring her

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here