Home क्राईम संगमनेर: महिलेच्या विनयभंगप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर: महिलेच्या विनयभंगप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Sangamner Crime: एका महिलेच्या विनयभंगप्रकरणी (molestation of a woman) माजी जिल्हा परिषद सदस्यांसह तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

a former Zilla Parishad member in the case of molestation of a woman

संगमनेर: तालुक्यातील घुलेवाडी येथे एका महिलेच्या विनयभंगप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्यांसह तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली. माहिती- अशी की, ही महिला घुलेवाडी परिसरात राहते. सदर महिलेने संगमनेर शहर पोलीस स्टेशनला झाडे तोडणेबाबत तक्रार दिली म्हणून याचा राग आल्याने सुनील दगडू रोकडे, राजू यादव खरात व माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम पुंजाजी राऊत (सर्व रा. घुलेवाडी) यांनी अपमानास्पद वागणूक दिली. सदर महिलेचा विनयभंग केला त्यानंतर महिलेची सासू व सासरा हे मध्ये आले असता त्यांनाही सुनील रोकडे व सिताराम राऊत या दोघांनी शिवीगाळ दमदाटी केली आणि त्यांचे शौचालय पाडून नुकसान केले. याप्रकरणी सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ ब, ३२३, ५०४, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शेख करत आहेत.

Web Title: a former Zilla Parishad member in the case of molestation of a woman

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here