अहमदनगर: महिला वाहून गेली, शोध मोहीम सुरु
Ahmednagar News: कुंड पर्यटन येथे पाय घसरून कुंडात पडलेली महिला वाहून गेली.
निघोज | अहमदनगर: पारनेर तालुक्यातील निघोज येथील रांजणखळगे (कुंड पर्यटन) येथे पाय घसरून कुंडात पडलेली महिला वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारस घडली. पद्माबाई शेषराव काकडे (वय ५५, रा. मोरेगव्हाण, ता. कारंजा, जि. वाशिम) असे मयत महिलेचे नाव आहे.
सदर महिला मंगळवारी सायंकाळी पाच वाजता रांजणखळगे परिसरात आली होती. हातपाय धुण्यासाठी त्या खडकाळ परिसरात धोक्याच्या ठिकाणी गेल्या असता त्यांचा पाय घसरला व त्या पाण्यात वाहून गेल्या.
यावेळी पद्माबाई यांचे जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र अपयश आले. या घटनेबाबत माहिती मिळताच निघोज पोलिस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल गणेश डहाळे हे घटनास्थळी दाखल झाले. कुंडाला पाणी जास्त असल्याने तसेच कुंड निघोज व टाकळी हाजी (ता. शिरुर) परिसरातील लोकांनी शोध मोहीम घेतली. मात्र, रात्री नऊपर्यंत महिला मिळून आली नाही.
Web Title: Ahmednagar Woman washed away, search operation on
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App