Home औरंगाबाद मुलाने गिळली शिट्टी, बोलला की फुर्रर्र आवाज!

मुलाने गिळली शिट्टी, बोलला की फुर्रर्र आवाज!

शिट्टी गिळल्यामुळे श्वास घेतल्यानंतर आणि बोलताना शिट्टीचा आवाज होत होता.

child swallowed the whistle, said that the sound

छत्रपती संभाजीनगर: एका १४ वर्षीय मुलाने चक्क खेळण्यातील शिट्टी गिळली. शिट्टी गिळल्यामुळे श्वास घेतल्यानंतर आणि बोलताना शिट्टीचा आवाज होत होता. अशा अवस्थेत या मुलाला घेऊन कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, उपचाराचा खर्च ऐकून त्यांचे डोळे पांढरे झाले. अखेर त्यास घाटीत दाखल केले. कान- नाक-घसा विभागातील डॉक्टरांनी शिट्टी काढून सुटका केली.

मुलाची स्थिती पाहून डॉक्टरही अवाक् झाले. शिट्टी श्वासनलिकेत खूप आतपर्यंत गेल्याने मुलाला श्वास घेणेही अवघड होत होते. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला तर शिट्टीचा आवाज येत होता. अर्ध्या तासात एंडोस्कोपीद्वारे त्याच्या श्वासनलिकेत अडकलेली शिट्टी काढण्यात डॉक्टरांना यश आले.

Web Title: child swallowed the whistle, said that the sound

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here