लग्नाचे अमिष दाखवून तरूणाचा तरूणीवर वारंवार अत्याचार
Ahmednagar News Live | अहमदनगर: लग्नाचे अमिष दाखवून तरूणाने तरूणीवर वारंवार अत्याचार (abused) केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच तरूणाच्या नातेवाईकाने पीडित तरूणीला धमकी दिल्याचे समोर आली आहे.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अत्याचार करणार्या तरूणासह त्याच्या नातेवाईकांविरूध्द अत्याचार, अॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्या तरूणीने फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा एप्रिल 2021 ते 10 डिसेंबर 2021 दरम्यान वडाळा (मुंबई) येथे व 11 जानेवारी 2022 ते 15 जानेवारी 2022 दरम्यान अहमदनगर शहरात घडली असल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.
राहील अन्सारी, मुसा अन्सारी, झेनाब अन्सारी, रझिया अन्सारी साहील अन्सारी (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. म्हाडा कॉलनी, भक्ती पार्क, वडाळा आय मॅक्स, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.
राहील अन्सारी याने लग्नाचे अमिष दाखवून वडाळा (मुंबई) येथे व अहमदनगर शहरामध्ये वारंवार अत्याचार केला. तसेच राहील व त्याच्या इतर नातेवाईकांनी जातीवाचक भाषेत बोलून लग्न करण्यास नकार देऊन भावना दुखविल्या असल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे करीत आहेत.
Web Title: Ahmednagar young man repeatedly abused the young woman by showing the lust of marriage