Home Suicide News Suicide श्रीरामपूर: विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Suicide श्रीरामपूर: विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Shrirampur Suicide by jumping into the well of a married woman

Ahmednagar News | Shrirampur Suicide | श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील निंमोणी मळा परिसरातील कसारवस्ती येथे एका विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  हिराबाई दादासाहेब कसार (वय 50) असे या विवाहितेचे नाव आहे. घरापासून काही अंतरावर असलेल्या सामायिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

घरातील व्यक्तींनी हिराबाई घरात आढळून येत नसल्याने सर्वत्र शोधाशोध केली. परंतु गट नंबर दोनशे दहा या सामायिक विहिरीजवळ मयत हिराबाई यांची चप्पल आढळून आल्याने संबंधित नातेवाईक, ग्रामस्थ यांनी विहिरीमध्ये लाईटच्या साहाय्याने डोकावून पाहीले असता विहिरीत हिराबाई यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. यावेळी या घटनेची माहिती ग्रामस्थांनी श्रीरामपूर पोलिसांना दिली.

त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष दरेकर तसेच धनंजय वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह बाजेच्या सहाय्याने वरती काढण्यात आला.  मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिकतपास पोलीस हवालदार संतोष परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष दरेकर करीत आहेत.

Web Title: Shrirampur Suicide by jumping into the well of a married woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here