Home अहमदनगर तरुणावर कोयत्याने हल्ला

तरुणावर कोयत्याने हल्ला

Ahmednagar young man was attacked with a scythe

अहमदनगर | Ahmednagar: गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून सहा जणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ३१ मार्च रोजी दुपारी एक वाजता बोल्हेगाव फाटा येथे घडली. या घटनेत भाऊसाहेब बबन मगर रा. ससेवाडी ता, नगर हा जखमी झाला आहे. त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आकाश कोठुळे, प्रतिक कांबळे, वैभव बोरुडे, शुभम भाकरे, महेश वैद्य, व एक अल्पवयीन मुलगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहे.  

Web Title: Ahmednagar young man was attacked with a scythe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here