चोरट्याने धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील गंठन लांबविले
अहमदनगर | Ahmednagar: दुचाकीवरून जात असताना महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठन ओरबाडून धूम ठोकण्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील पाईपलाईन रोडवरील प्रशांतनगर येथे रात्री ८:३० च्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी छाया किशोर काळे रा. पाईपलाईन रोड यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार छाया काळे या रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना त्यावेळी पाठीमागून आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठन ओरबाडून धूम स्टाईलने धूम ठोकली. त्यांनी यावेळी आरडाओरडा केला तेव्हा परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास निरीक्षक सुरसे हे करीत आहेत.
चोरी, घरफोडी अशा गुन्हेगारीचे सत्र वाढतच असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
Web Title: Ahmedngar Dhoom Style theft