Home अहमदनगर सासऱ्याने सुनेकडे केली शरीर सुखाची मागणी

सासऱ्याने सुनेकडे केली शरीर सुखाची मागणी

Ahmednagar News Today father-in-law asked Sune for body pleasure

श्रीगोंदे | Ahmednagar News Today: तालुक्यातील दक्षिण भागातील एका गावात चक्क सासऱ्याने सुनेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सासऱ्याविरोधात श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पती व दोन मुलांसह राहणाऱ्या महिलेची शेतीवर उपजीविका आहे. अंगावर कोडे फुटलेले असल्यामुळे घरातील लोक तिला कायम त्रास देतात. २५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता फिर्यादी व तिची मुले जेवण करून झोपण्यासाठी गेले असता त्यावेळी सासरा दारू पिऊन सुनेजवळ आला व शरीर सुखाची मागणी करू लागला. पिडीत महिलेने नकार देऊन त्याला घराबाहेर दिले. जाताना सासऱ्याने सुनेचा विनयभंग करून मारहाण केली.

बाहेरगावी गेलेला पती घरी आल्यावर पत्नीने हा प्रकार पतीला सांगितला. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल लता पुराणे हे करीत आहे.

Web Title: Ahmednagar News Today father-in-law asked Sune for body pleasure

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here