Home अकोले अजित दादा की शरद पवार?  आ. डॉ. किरण लहामटे यांनी घेतला निर्णय

अजित दादा की शरद पवार?  आ. डॉ. किरण लहामटे यांनी घेतला निर्णय

Akole News:  अकोल्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

Ajit Dada or Sharad Pawar come to Dr. Kiran Lahamte took the decision

अकोले:  अकोल्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवडीचे स्वागत करीत आपण व आपले सहकारी अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांची भूमिका सध्या तरी वेट अँड वॉच अशी असल्याचे दिसत आहे.

अजित पवार यांना पाठिंबा देणारे आमदार डॉ किरण लहामटे यांनी “मी जनतेबरोबर” असे सांगत आपल्या भूमिकेबद्दल ची संदिग्धता कायम ठेवली आहे. आ.डॉ. किरण लहामटे यांनी आज पिंपळगाव खांड धरणाच्या जलपूजन कार्यक्रम प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना आपण जनतेबरोबर असे सांगत संभ्रमावस्था वाढविली आहे. तालुक्याला आनंदाची बातमी समजणार का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना तालुक्यातील विकास कामांना निधी मिळावा याच्या इतका दुसरा कोणताही आनंद नाही असे म्हणत दुसरीकडे ‘तालुक्यातील जनता जिकडे तिकडे मी’ अशी संभ्रमावस्थेची भूमिका आ.डॉ. किरण लहामटे यांनी सद्यस्थितीत घेतल्याचे दिसत आहे. 

शपथ विधीला हजर असणारे आ. लहामटे काय निर्णय याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या तरी त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. जनता ठरवेल तो निर्णय मी घेणार असे त्यांनी जाहीर केले असून उद्या मंगळवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. 

दरम्रायान ज्यामध्ये अचानकपणे नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. या घडामोडीच्या केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. त्यामुळे अकोलेचे राष्ट्रवादी चे आमदार डॉ किरण लहामटे काय भूमिका घेतात याकडे तालुक्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते.अखेर डॉ लहामटे यांनी अजित पवार यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. 

मागील वेळी झालेल्या बंडाच्या वेळी आमदार किरण लहामटे यांनी सावध भुमीका घेत शरद पवार यांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला होता.महाविकास आघाडी च्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाले होते मात्र रात्रीतुन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लहामटे यांचे नाव वगळून नगर जिल्ह्यातून आपले भाचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री म्हणून संधी दिली होती.त्यामुळे मागील वेळी झालेली चूक आता परवडणारी नाही म्हणून आमदार लहामटे यांनी मोठे पवार यांची साथ सोडत अजित दादांसोबत  जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे माहिती समोर आली होती. 

Web Title: Ajit Dada or Sharad Pawar? come to Dr. Kiran Lahamte took the decision

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here