Home अहमदनगर 27 मार्चला मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार: अजित नवले

27 मार्चला मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार: अजित नवले

27 मार्चला मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार – अजित नवले

अहमदनगर: २० मार्चपासून नाशिकमधून शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मोर्चा सुरु होऊन २७ मार्चला तो मंत्रालयावर पोहोचेल. सरकारकडून अजूनही शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे असा आरोप अजित नवले यांनी केला. प्रत्येकवेळी शेतकरी लुटला गेला आहे. शेतमालाचे भाव वाढले की, सरकार हस्तक्षेप करत भाव पाडते. कीटकनाशकाचा भाव सरकारला निश्चित करता येत नाही असा आरोप अजित नवले यांनी केला.

शेतकऱ्यांची झालेली लूट आम्ही परत मागत आहोत, ती कर्जमाफी नव्हे. उद्योगांची करमाफी व कर्जमाफी मिळून सरकारने 18 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. त्यावर कोणी बोलत नाही. त्यांना का कर्जमाफी म्हणून कोणी आक्षेप घेत नाही. मग, शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे का होते. एकाही उद्योजकाने आत्महत्या केली नाही मात्र येथे शेतकरी रोज मरत आहेत. शेतकरी आणि उद्योजक दोघेही भारताचे नागरिक आहेत. पण दोघांनाही वेगवेगळा न्याय का दिला जातो.

आता सरकारशी तिसरा टप्पा रस्त्यावरच्या लढाईचा असेल आता संपूर्ण कर्जमाफीशिवाय मागे हटायचे नाही. सरकारने कर्ज मुक्ती देऊ केली परंतु त्यात उर्वरित कर्ज भरायचे अशी अट टाकत कर्ज मुक्ती नाही तर कर्ज वसुली केली आहे. जेवढे पैसे सरकारने माफ केले नाही त्याच्या किती तरी पटीने वसूल करून घेतली. आता हटणार नाही मुख्यमंत्री यांना सोडणार नाही. संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय मागे हटणार नाही असेही अजित नवले यांनी अहमदनगर येथील राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेत बोलताना म्हंटले आहे.

पहा बातमीत – संगमनेर: महिलेस ऊसाच्या ट्रँक्टरने चिरडले जागीच मृत्यू

Website Title: Ajit Navale Farmers morcha will be hit in the ministry


संपूर्ण बातम्यासाठी पहा: संगमनेर न्यूज व अकोले न्यूज 


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here