अकोले: अभिनव च्या एम.बी.ए. विभागामध्ये मध्ये कु. कल्याणी कराड प्रथम
अकोले: अभिनव च्या एम.बी.ए. विभागामध्ये मध्ये कु. कल्याणी कराड प्रथम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत एप्रिल/मे २०१८ मध्ये पार पडलेल्या एम.बी ए. महाविद्यालयांचा निकाल जाहीर झाला असून अभिनव शिक्षण संस्थेच्या एम.बी.ए. चा निकाल ६० टक्के इतका लागला असून महाविद्यालयातून कु. कल्याणी कराड हिने ७०.६३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर कु. किरण कडलग या विद्यार्थिनीने ६७.४७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला तर कु.कांचन माळवे या विद्यार्थिनीने ६५.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. अभिनवच्या एम.बी.ए. महाविद्यालयाची उपक्रमशील महाविद्यालयामध्ये नेहमीच गणना होते. महाविद्यालयाने उत्कृष्ट गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांना नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळवून दिल्या त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात देखील अभिनवच्या एम.बी.ए. मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश प्रक्रियेद्वारे पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले , उपाध्यक्ष सुरेशराव कोते , सचिव प्राचार्य रमेशचंद्र खांडगे, खजिनदार भाऊसाहेब नाईकवाडी, प्रा.भक्ती कोते सर्व सदस्य आय एम बी ए चे प्रोजेक्ट मॅनेजर.प्रा. किरण गोंटे, प्रा. अनिल बेंद्रे, प्रा. रेणुका देशमाने संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दिलीपकुमार मंडलिक आदींनी अभिनंदन केले.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
Job vacancy in Axis Placement Services
Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).