Home अकोले अकोले: अमृतसागर सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी 15 जागांसाठी 96 अर्ज दाखल

अकोले: अमृतसागर सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी 15 जागांसाठी 96 अर्ज दाखल

Akole Amrutsagar Election: संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी ९६ अर्ज दाखल, शुक्रवारी होणार अर्जाची छाननी, किती अर्ज बाद होणार याकडे राजकीयांचे लक्ष लागून.

Akole Amrutsagar Election 2022

अकोले: अमृतसागर सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी 15 जागांसाठी 96 अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केलेल्यामध्ये पंचायत समितीचे माजी सभापती व दुध संघाचे माजी संचालक विठ्ठलराव चासकर, आनंदराव वाकचौरे, उद्योजक सुरेश गडाख, अगस्ति कारखान्याचे माजी संचालक, शिवसेनेचे नेते महेशराव नवले, रामहरी तिकांडे, या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. उद्या (शुक्रवार) रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. छाननीच्या नियमांमध्ये झालेल्या बदलामुळे छाननीत किती अर्ज बाद होतात याकडे उमेद्वारांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

अमृतसागर सहकारी दुध संघाची संचालक मंडळाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहिर झाला. अगस्ति कारखान्याच्या निवडणुकीनंतर तालुक्यातील पहिलीच सहकारी संस्थेची निवडणूक होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. बुधवारी संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी 64 तर आज गुरुवारी 32 आशा एकूण 96 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात अनेकांनी एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज भरल्याने हि संख्या जास्त दिसत आहे.

पहिल्या दिवशी माजी आमदार व दुध संघाचे अध्यक्ष वैभवराव पिचड, उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम विभागाचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, अगस्ति कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गुलाबराव शेवाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, ज्येष्ठ नेते ऍड के बी हांडे, माजी पं स सदस्य आप्पासाहेब आवारी, यांचेसह शिवाजी नवले, शंकर डगळे, विठ्ठलराव डुंबरे, सोपान मांडे, अरुण गायकर, अर्चना गौराम गजे, गंगाराम धुमाळ, कैलास पुंडे, रेवचंद भोर, राजेंद्र वाकचौरे, कैलास जाधव, भाऊसाहेब कासार, सुभाष बेनके, भानुदास डोंगरे, दत्तात्रय वाकचौरे, प्रतापराव देशमुख, भाऊपाटील नवले, गोरक्ष मालुंजकर, बबन चौधरी, सतीश फापाळे, लताबाई अशोक देशमुख, शरद चौधरी, कुमुदिनी सदाशिव पोखरकर, जगन देशमुख, गंगाधर नाईकवाडी, रामदास आंबरे, अश्विनी प्रविण धुमाळ, प्रकाश देशमुख, प्रकाश नाईकवाडी, नंदा सदाशिव कचरे, अरुण देशमुख, दीपाली अनिल देशमुख, विजय घिगे, बाळासाहेब मुंढे, चित्रा प्रताप धात्रक, सुभाष डोंगरे, दयानंद वैद्य, गवराम ताजने, सुनिल देशमुख, रविंद्र हांडे, नलिनी भाऊसाहेब गायकर, आबाजी तळेकर, पांडुरंग कचरे, शोभा विठ्ठल आरोटे, विजय देशमुख, नंदू गंभीरे व बाबुराव बेनके या संघाच्या आजी माजी पदाधिकारी व संचालकांनी अर्ज दाखल केले होते.

तर आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी बाळासाहेब पानसरे,रामदास आंबरे,रावसाहेब वाकचौरे, सुजाता शिवाजी शेटे, मारुती लांडे, शिवाजी गायकर, शंकर डगळे, शरद चौधरी, सुलोचना भाऊसाहेब औटी, दादापाटील वाकचौरे, बाळासाहेब वाकचौरे, माधव चौधरी, गणपत डगळे, नितीन नवले, दयानंद वैद्य, संपत वाकचौरे, बाळासाहेब भांगरे, राधाकीसन कोटकर, विलासराव शेवाळे, सुलोचना औटी, दगडू हासे व रामनाथ आरोटे यांनी अर्ज भरले आहेत.

Web Title: Akole Amrutsagar Election 2022

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here