Home अहमदनगर अहमदनगर: महिलेचा पाठलाग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर: महिलेचा पाठलाग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime:   दुचाकीवरून एक इसम घरासमोर येऊन थांबतो व तो दररोज पाठलाग करतो, एकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Crime has been registered against the person who chased the woman

अहमदनगर: तुझा नंबर दे नाही, तर तुझा सारखा पाठलाग करीन,  असे म्हणत महिलेचा पाठलाग केल्याप्रकरणी एकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

ही घटना केडगाव परिसरात बुधवारी (दि. १५) घडली. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एमएच १६ सीएस ६५३६ क्रमांकाच्या दुचाकीवरून एक इसम घरासमोर येऊन थांबतो व तो दररोज पाठलाग करतो. ही बाब महिलेने पतीला सांगितली. त्यानंतर महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन फिर्यादी दिली.

एका उपनगरामधील महिलेचे लेडिज शॉपी नावाचे दुकान आहे. एक तरुण 5 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पल्सर दुचाकी (एमएच 16 सीएस 6536) वरून या दुकानात आला. या दुकानातून टेलरिंगचे काही साहित्य खरेदी केले. त्यानंतर सातत्याने या दुकानासमोर उभा राहून एकटक या महिलेकडे पाहत राहिला. सदरची महिला मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेल्यास तेथेही पाठलाग करत असे. या त्रासाला कंटाळून महिलेने हा प्रकार घरी पतीला सांगितला.

पतीने मानसिक आधार दिल्यानंतर महिलेने पल्सर दुचाकीवरून पाठलाग करणार्‍या तरुणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार औटी पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Crime has been registered against the person who chased the woman

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here