Home अकोले अकोले: आदिवासींसह इतर लाभार्थी धान्यापासून वंचित : लाभार्थी ई-पॉस मशीनमधून गायब

अकोले: आदिवासींसह इतर लाभार्थी धान्यापासून वंचित : लाभार्थी ई-पॉस मशीनमधून गायब

Akole food grains: आधार लिंक नसल्याने ११ हजार लाभार्थी ई-पॉस मशीनमधून गायब.

Akole beneficiaries including tribals deprived of food grains

अकोले : आधार क्रमांक लिंक अकोले नसल्याने सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदाराकडे ऑनलाइन धान्य पुरवठा करण्यासाठी देण्यात आलेल्या ई-पॉस मशीनमधून ११ हजार ४६ लाभार्थी दिसेनात. याचा परिणाम म्हणून हे लाभार्थी रेशन धान्यापासून वंचित राहिले आहेत. यातूनच दुकानदार आणि लाभार्थी यांच्यामध्ये वाद होत आहेत. काही ठिकाणी मोबाइल रेंज मिळत नसल्याने लाभार्थ्यांची पायपीट होत आहे.

सध्या ऑगस्ट महिन्याचे धान्य वाटप सुरू असून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर तीन महिन्यांचे धान्य अद्याप तालुक्यात पोहोचलेलेच नाही. प्रशासकीय अनास्थेमुळे रेशन कार्डधारकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

अकोले तालुक्यात अंत्योदय व प्राधान्य मिळून २ लाख १२ हजार १२२ रेशन कार्ड आहेत. ११ हजार ४६ रेशन कार्ड आधार लिंक नसल्याने रेशन धान्य दुकानदार आणि लाभार्थी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. धान्य पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणारी ई-पॉस मशीनचा सतत सर्व्हर डाऊन होत आहे, तर कधी हाताचे ठसे उमटत नाहीत. बऱ्याच ठिकाणी आदिवासी भागात डोंगरदरीत मोबाइल रेंज मिळत नाही. म्हणून धान्य पुरवठा सुरळीत होत नाही. धान्य मिळत नसल्याच्या लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच काहीजणांनी विवाह नोंदणी करून नावे कमी केलेली नाहीत. तर काही स्थलांतरित झाले आहेत. ज्यांचे आधार लिंक झालेले नाही, अशा लाभार्थ्यांची नावे ई-पॉस मशीनवरून गायब झाली आहेत.

वेळच्या वेळी आधार लिंक झालेले नाही. तसेच रेशन कार्डवर लहान मुलांची नावे आहेत. त्यांचा आधार नंबर नाही. अनेक ज्येष्ठांच्या हाताचे ठसे आहेत. उमटत नाहीत, त्यांचेदेखील आधार लिंकिंग वेळेवर झालेले नाही, अशा अनेक अडचणी लाभार्थ्यांना येत

नावावरील धान्य जाते कुठे ?

पुरवठा विभागात केवळ दोन ऑपरेटर तालुक्याचा कारभार पाहत असल्याने या कामाला मर्यादा आली आहे. ११ हजार ४६ लाभार्थ्यांचे रेशन गायब होत असल्याचे वरकरणी दिसत असले तरी हे रेशन शिल्लक कोट्यातून कपात करून पुढच्या महिन्यातील रेशन कोट्यात वर्ग केले जाते. काही रेशन कार्डचे आधार लिंक नाही, बायोमेट्रिक धान्य पुरवठा केला जातो.

ऑगस्ट महिन्याचे सध्या वाटप

तालुक्यात १६२ रेशन दुकाने आहेत. धान्य पुरवठा करणाऱ्या गाड्यांना जीपीएस बसवलेले आहे. प्राधान्य व अंत्योदय असे एकूण जून महिन्याचे ९३६१.२७ क्विटल धान्य वाटप झाले आहे. ऑगस्ट महिन्याचे १०६०७.३० क्विटल धान्य तालुक्यात दाखल असून, त्याचे वाटप सुरु आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे धान्य आले नाही, असे नायब तहसीलदार सुधीर उबाळे व तालुका पुरवठा निरीक्षक रसिक सातपुते सांगतात.

काळ्या बाजाराला बळ

धान्य पुरवठा गाडीला जीपीएस, ई-पॉस मशीन, बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप या गोष्टी असल्या तरी रेशन धान्य घोटाळ्याची आवई उठतेच. बरेच लोक रेशनचे धान्य घेतात. पण खात नाहीत. काही लोक कॅटल फिडसाठी रेशन धान्य विकतात. राजूर, कोतुळ, समशेरपूर अशा मोठ्या गावात खरेदी करण्याचे रॅकेट असते. रेशन लाभार्थी स्वखुशीने धान्य विकतात. काही मद्यपी आपले रेशन धान्य आपल्या घरापर्यंत पोहोचू देत नाहीत, यातूनच रेशन धान्याच्या काळ्या बाजाराला बळ मिळत असल्याची चर्चा आहे.

Web Title: Akole beneficiaries including tribals deprived of food grains

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here