Home Accident News कारने दुचाकींना उडविले , अपघातात स्नेहालयातील दोघा समाजसेवकांचा मृत्यू

कारने दुचाकींना उडविले , अपघातात स्नेहालयातील दोघा समाजसेवकांचा मृत्यू

Ahmednagar Accident: कारने दुचाकींना उडविले : विसापूर फाटा येथील घटना.

Two social workers of Snehalaya were killed in the accident 

श्रीगोंदा: नगर-दौंड महामार्गावर एका इंडिका कारने ट्रकला ओव्हरटेक करत असताना दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील स्नेहालय संस्थेतील दोघा समाजसेवकांचा मृत्यू झाला, तर दोनजण जखमी झाले. मंगळवारी (दि. २२) सकाळी १० वाजता ही घटना घडली.

सरिता भारत कुलकर्णी (वय ३८) व सचिन भीमराव काळे (वय ४३, रा. दोघे अहमदनगर) अशी मयतांची नावे आहेत. सुरेश साहेबराव कवडे व पोपट भाऊ साबळे (रा. दोघे कोरेगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले. स्नेहालय संस्थेच्या कामकाजाच्या निमित्ताने सरिता कुलकर्णी व सचिन काळे हे मंगळवारी सकाळी श्रीगोंद्याकडे जात असताना विसापूर फाट्याजवळ दौंडकडून आलेल्या कारने दोन दुचाकीला धडक दिली. यात कुलकर्णी व काळे हे ठार झाले.

हे दोघे स्नेहालय संस्थेच्या स्नेहदीप रुग्णसेवा केंद्रात कार्यरत होते. दरम्यान, दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जखमी झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, अमोल लगड हे घटनास्थळी दाखल झाले.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

त्यांनी जखमींना उपचारासाठी, तर मयतांचे मृतदेह नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यास मदत केली.

अपघातातील इंडिका कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मयत सरिता कुलकर्णी यांच्या मागे पती, दोन मुलगे असा परिवार आहे. सचिन काळे यांच्या मागे दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Two social workers of Snehalaya were killed in the accident 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here