Home अकोले अकोले: कळपाजवळच बिबट्याचा मेंढपाळावर हल्ला 

अकोले: कळपाजवळच बिबट्याचा मेंढपाळावर हल्ला 

Akole Bibatya attacks shepherd

अकोले: अकोले तालुक्यातील पापळवाडी परिसरात मेंढ्यांच्या काळापाशेजारी झोपलेल्या मेंढपाळ याच्यावर हल्ला चढविल्याची घटना शुक्रवारी रात्री १२,३० वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात अंकुश रामदास पोकळे हा मेंढपाळ जखमी झाला आहे.

यबाबत अधिक माहिती अशी की, पापळवाडी परिसरात एका शेतात मेंढ्यांचे कळप बसलेले आहे. शुक्रवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास बिबट्या कळापाजवळ आला. वाघुरीच्या बाहेर झोपलेल्या असलेल्या अंकुश रामदास पोकळे या मेंढपाळवरच बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी त्याने मोठा आरडाओरडा केला. आरडाओरडा होताच बिबट्याने उसात धूम ठोकली. यामध्ये मेंढपाळच्या डोक्याला नखे लागल्याने किरकोळ जखमी झाला आहे. शनिवारी याने अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केल्याने वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एम. पोले यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री पिंजरा लावण्यात आला आहे.  

Web Title: Akole Bibatya attacks shepherd

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here