Home अकोले अकोलेतील घटना: गवत दुसऱ्याला का विकले असे म्हणत कुऱ्हाड डोक्यात घातली

अकोलेतील घटना: गवत दुसऱ्याला का विकले असे म्हणत कुऱ्हाड डोक्यात घातली

Akole Crime ax in his head saying why he sold the grass to someone else

Akole Crime | अकोले: अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे गवत दुसऱ्याला का विकले असे म्हणत कुऱ्हाडीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अकोले पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अण्णासाहेब गोविंद कानवडे रा. लिंगदेव ता. अकोले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत रावसाहेब पंढरीनाथ कानवडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावसाहेब पंढरीनाथ कानवडे यांच्याजवळच त्यांचे चुलत भाऊ अण्णासाहेब गोविंद कानवडे राहतात. या दोघांत शेतातील रस्त्यावरून नेहमी वाद होतात. अण्णासाहेब हा नेहमी त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी देत असत. रावसाहेब कानवडे हे गुरुवारी त्यांच्या घरासमोर उभे होते. तेव्हा अण्णासाहेब कानवडे हा त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, तु माझ्याकडे रागाने का पाहतोस, तु गवत दुसऱ्याला का विकले. ते माझ्या रस्त्यावरून घेऊन जाऊ देणार नाही असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता तो अंगावर धावून आला त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. रावसाहेब यांनी त्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु अण्णासाहेब याने त्याच्या हातातील कुऱ्हाड रावसाहेब यांच्या डोक्यात मारली. डोक्यात कुऱ्हाडीचा मार बसल्याने रावसाहेब मोठ्याने ओरडले. यावेळी आजूबाजूचे लोक जमा झाले. यावेळी रावसाहेब यांची आई, सासूबाई आणि मुलगा यांना देखील अण्णासाहेब यांनी मारहाण केली. या भांडणात रावसाहेब यांना जास्त मार लागल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. अकोले तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यानी याप्रकरणी जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.  

Web Title: Akole Crime ax in his head saying why he sold the grass to someone else

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here