Home अहमदनगर अहमदनगर: पोलिसांची पैसे गोळा करण्याची ऑडियो क्लिप व्हायरल  

अहमदनगर: पोलिसांची पैसे गोळा करण्याची ऑडियो क्लिप व्हायरल  

Shrirampur Police Police money laundering audio clip goes viral

श्रीरामपूर | Shrirampur: श्रीरामपुरात पोलीस निरीक्षक आणि एका पोलीस कर्मचार्यात पैसे गोळा करण्याविषयी ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दोन पोलीस कर्मचारी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्याची घटना घटना घडली असताना नाव प्रताप समोर आला आहे.

पोलीस निरीक्षक व कर्मचारी राउत व वैरागर नावाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या या दोन ऑडियो क्लिप आहेत.

पहिल्या क्लिपमध्ये निरीक्षक हे राउत यांना तुम्हीं पुन्हा पैसे का गोळा केले? असे धमकावत आहेत. कलेक्शनचे काम वैरागर यांना देण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही तिकडे का जाता? अशी विचारणा करण्यात आली आहे. कर्मचारी राउत हे आपण ते काम करत नाही. मात्र वैरागर यांनाही ते करू देऊ नये असे सांगतात. त्यावर निरीक्षक भलतेच रागवत राउत याना ठाण्यात येण्याचे आदेश देतात. वैरागर यांना कलेक्शनचे काम करू देऊ नये असे सांगणारे तुम्ही कोण? असा जाब निरीक्षक हे राउत यांना विचारतात. आपण जिल्हा प्रमुखाकडे तक्रार करणार असल्याचे राउत यांनी क्लीपमध्ये म्हंटले आहे.  

दुसरी क्लीप राउत व वैरागर यांच्यातील आहे. यात वैरागर हे राउत यांना ते काम करत जाऊ नको. त्यामुळे दहातील केवळ चार लोक पैसे देतात व इतरजन देत नाहीत असे सांगण्यात आले आहे. लोकांना आता कायद्याचे ज्ञान आलेले आहे. मात्र आपल्याकडे येताच लोकांना सरळ केले जाते. असे राउत त्यांना सांगत आहे. वैरागर हे राउत यांना धमकावत यापुढे चहा पाण्याला देत जैन मात्र लोकांकडे जाऊ नका असे क्लीपमध्ये बोलत आहे.

दरम्यान तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी या क्लीपबाबत म्हंटले आहे की, पोलीस कर्मचार्याने रागातून खोडसाळपानातून हा प्रकार केला आहे.  

Web Title: Shrirampur Police Police money laundering audio clip goes viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here