Home अकोले Akole: अकोले तालुक्यात मंदिरांतील दानपेटी फोडण्याचे सत्र सुरूच

Akole: अकोले तालुक्यात मंदिरांतील दानपेटी फोडण्याचे सत्र सुरूच

Akole Crime News breaking the donation boxes in the temples continues

कोतूळ | Akole Crime News: अकोले तालुक्यात मंदिरातील दानपेटी फोडण्याचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. अकोले पोलिसांनी मागील आठवड्यात दोन चोरट्यांना रंगेहाथ पकडले आहे. मात्र तालुक्यातील कोतूळ येथील श्री वरदविनायक मंदिराची दानपेटी फोडण्याचा तर शनी मंदिरातील दानपेटीच चोरून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कोतूळ येथील श्री वरदविनायक गणपती मंदिर हे प्राचीन व जागृत देवस्थान आहे परिसरात नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. शनिवारी पहाटे एक ते पाचच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गणपती मंदिरा गाभार्‍याचा कडी-कोयंडा तोडून मंदिरात प्रवेश केला.

मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला. त्यानंतर गणपती मंदिरा शेजारी असलेल्या शनी मंदिराचे कुलूप चोरट्यांनी तोडले व मंदिरात प्रवेश करत तेथेही दानपेटी फोडता न आल्याने दानपेटीसह चोरट्यांनी पोबारा केला. मंदिराचे पुजारी त्रिंबक शेटे नियमित पूजेसाठी सकाळी सहा वाजता मंदिरात गेले असता सदरची चोरी झाल्याचे समोर आले.  ही खबर गावात वार्‍याच्या वेगाने पसरल्याने गणेश भक्तांनी मंदिर परिसरात सकाळी मोठी गर्दी केली होती. एक व्यक्ती दानपेटी चोरून नेत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे.

हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स

याबाबत प्रदीप भाटे, विनय समुद्र, दीपक परशुरामी यांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Akole Crime News breaking the donation boxes in the temples continues

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here