Home अकोले अकोलेतील धक्कादायक घटना: चुलत भावानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अकोलेतील धक्कादायक घटना: चुलत भावानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Akole Crime News Cousin tortures minor girl

अकोले | Crime News:  अकोले तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर चुलत भावानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील पळसुंदे येथे ही घटना घडली आरोपीला न्यायालयाने ७ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी अटक केली आरोपीला  पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत माहिती अशी की, १७ वर्षीय  अल्पवयीन मुलीने अकोले पोलिसांत फिर्याद दिलीआहे. या फिर्यादीनुसार  दि.२/१२/२०२१ रोजी दुपारी दीड ते दोन वाजणेच्या सुमारास अल्पवयीन पिडीत मुलगी पळसुंदे गावातून घराकडे जात असताना त्यावेळी शेजारी राहणारा चुलत भाऊ किसन वामन कचरे (वय 21 वर्षे ) रा- पळसुंदे ता- अकोले याने फिर्यादीस मिठी मारून तिला पाऊल वाटेनं ओढ्याकडे एका झाडाजवळ ओढत नेले आणि खाली पाडून तिच्यावर अत्याचार केला व तू जर घरी कोणाला काही सांगितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली  असे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून अकोले पोलिस स्टेशनला गु.र.नं.व कलम- I 471/2021 भादवि कलम 376(2)(F)(J),504,506 प्रमाणे बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 4,6,8,12,18 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे

याप्रकरणी आरोपी किसन वामन कचरे यास  अटक करुन आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ डिसेंबर २०२१ पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी  सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उपनिरीक्षक श्री हांडोरे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Akole Crime News Cousin tortures minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here