Home अहमदनगर अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरूणीवर अत्याचार

अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरूणीवर अत्याचार

Ahmednagar Crime News Sexual Physical contact 

अहमदनगर | Ahmedagar: लग्नाचे अमिष दाखवून तसेच अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी औरंगाबाद येथील तरूणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहिदास भागचंद पालवे (रा. कोल्हूबाई कोल्हार ता. पाथर्डी) या तरूणाविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची घटना 2 जून 2021 व त्यानंतर वेळोवेळी जेऊर (ता. नगर) परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली. रोहिदास पालवे याने फिर्यादी तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून  रोहिदास याने फिर्यादी सोबत तीच्या इच्छेविरूद्ध वेळोवेळी शारीरीक संबंध ( Sexual Physical contact) ठेवले.

तसेच रोहिदास याने फिर्यादीस तुझे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. सदरची घटना जर कोणाला सांगितली तर तुला जीवे ठार मारून टाकीन अशीही धमकी दिली असल्याचे पिडीत तरूणीने फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधोर करीत आहे.

Web Title: Ahmednagar Crime News Sexual Physical contact 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here