Home महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह थेट बसस्थानकात

एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह थेट बसस्थानकात

Body of ST employee directly at bus stand

नांदेड | Nanded : नांदेड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना प्रकृती बिघडली. यामध्ये उपचार सुरु असताना कर्मचारी दिलीप विठ्ठल वीर (वय ५५) यांचे आज निधन झाले. गुरुवारी दिलीप वीर यांना ब्रेन हॅमरेज व रक्तदाब वाढल्याने हृदविकाराचे दोन झटके आले होते. आंदोलनाच्या तणावातून वीर यांचे निधन झाल्याचा आरोप करत जिल्ह्यातील एसटीचे कर्मचारी आणखी आक्रमक झाले आहेत.

निधन झालेल्या दिलीप वीर यांचा मृतदेह (Body) थेट बसस्थानकात आणण्यात नेण्यात आला. दिलीप वीर यांच्या मृत्यूस जबाबदार ठरवत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व  कुटुंबीयास ५०लाखाची मदत करावी आणि कुटूंबातील एकाला एसटीमध्ये नोकरी द्यावी अशी मागणी आता संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे..

जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत दिलीप वीर यांचा मृतदेह बस्थानकातून हलवणार नाही व यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याची भुमिका वीर यांच्या कुटुंबियांसह आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे एसटी बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रभारी अधिकारी अशोक पन्हाळकर व बस स्थानक प्रमुख पुरुषोत्तम व्यवहारे यांनी कर्मचारी व वीर कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

Web Title: Body of ST employee directly at bus stand Nanded

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here