Home Marathi Batmya Today Live मग बस कर्मचारी यांच्या डेथ सर्टिफिकेटवर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचं का

मग बस कर्मचारी यांच्या डेथ सर्टिफिकेटवर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचं का

why print a photo of the Chief Minister on the death certificate of the bus employee

नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचे संसदेतील भाषणात मोदी सरकारवर तुफान फटकेबाजी करत लक्ष्य केल्याने चर्चेचा विषय बनला आहे. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे कौतुक केले आहे. मोदी सरकारवर जहरी टीका देखील केली आहे.

खा. कोल्हेच्या टीकेला भाजपा नेते खासदार डॉ. सुजय विखे यांनी जशास तसे प्रत्युतर दिले आहे. Video Amol Kolhe: 

जर लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापायचा असेल तर मृत्यू प्रमाणपत्राची जबाबदारी पण घ्यायला हवी असे खा. कोल्हे म्हणाले होते. यावर विखे यांनी प्रत्युत्तर देताना राज्यातील एसटी कारामागारांच्या डेथ सर्टिफिकेटवर मग मुख्यमंत्री यांचा फोटो छापायचं का? असा प्रतिप्रश्न एबीपी माझा शी बोलताना केला. या सरकारच्या काळातील आत्महत्यानुसार फोटो छापायला गेलो तर सर्वात जास्त डेथ सर्टिफिकेट महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री यांचे लागतील दुसरे कोणाचेही नाही असे म्हणत सुजय विखे यांनी अमोल कोल्हेच्या टीकेवरून महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे.

Web Title: why print a photo of the Chief Minister on the death certificate of the bus employee

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here