Home अकोले Crime News अकोले घटना : तू मला फार आवडतेस असे म्हणत महिलेचा...

Crime News अकोले घटना : तू मला फार आवडतेस असे म्हणत महिलेचा विनयभंग

Akole Crime News Molestation of a woman

अकोले | Crime News: तू मला फार आवडतेस असे म्हणून एका बार चालकाने आम्लेट पाव विकणाऱ्या महिलेच्या घरात घुसून मिठी मारल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवदूत काशिनाथ घोडके रा. गुजरी मार्केट ता. अकोले असे या गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अकोले पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, अकोले येथील शाहूनगर परिसरातील एका ३१ वर्षीय महिलेचा आम्लेटपाव विक्रीचा व्यवसाय असून उदानिर्वाह करत आहे.

दरम्यान एके दिवशी रात्री ८ वाजेच्या सुमारास पिडीत महिला तिच्या घरात टीव्ही पाहत बसली होती. आणि दुसऱ्या घरात एक मुलगा अभ्यास करत होता. तेव्हा अवधूत घोडके हा अचानक घरात येऊन पिडीत महिलने विचारले की, तू इथे काय करतो आहे. तेव्हा तो म्हणाला की, तू मला फार आवडतेस असे म्हणत त्याने महिलेस मिठी मारून अश्लील चाळे करण्यास सुरु केले असता महिलेने प्रतिकार केला. आणि स्वतः ला त्याच्या तावडीतून सोडवून घेतले. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने आरोपीने तेथून पळ काढला. तसेच जर हा प्रकार कोणास सांगितला तार तुझ्याकडे बघून घेईन अशी धमकी आरोपीने दिली. त्यानंतर महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.  

Web Title: Akole Crime News Molestation of a woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here