अकोले तालुक्यातील घटना: मुलावर गुन्हा दाखल झाल्याने आई वडिलांची आत्महत्या
अकोले | Akole Crime: मुलावर अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल केल्याने तसेच आई वडिलांना सह आरोपी करण्यात आल्याने लोक काय म्हणतील व समाजात बदनामी होईल या भीतीपोटी मुलाच्या आई वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना अकोले तालुक्यातील चिंचवने येथे घडली.
याबाबत राजूर पोलिसांत दीपक सोमनाथ कुलाळ रा. चिंचवने ता. अकोले याने फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार, संबंधित युवती व तिच्या वडिलांनी माझा भाऊ व आई वडिलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा मागे घेतो पण त्यासाठी दवाखान्याचा खर्च व दोन लाख रुपये द्या अन्यथा तुम्हाला केसमध्ये अडकवतो अशी धमकी दिली. गुन्हा दाखल झाल्याचे बदनामीमुळे व केसमध्ये अडकविण्याच्या भीतीमुळे दीपकचे वडील सोमनाथ नामदेव कुलाळ(वय 50) जिजाबाई सोमनाथ कुलाळ (वय 45) (रा चिंचवणे, ता. अकोले) यांनी घरात लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
येथे पहा: हार्दिक पांड्या टॉप सिक्सेस, हेलिकॉप्टर शॉट 6666
संबधित युवती व तिच्या वडिलांनी त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. त्यावरून राजूर पोलिसांनी संबंधित युवती व तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने राजुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे पोलीस पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी घटनास्थळी भेट आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहे.
Web Title: Akole Crime Suicide of parents due to filing a case