Home अहमदनगर या तालुक्यात सात लाखाच्या मांडूळाची तस्करी करणाऱ्यास अटक

या तालुक्यात सात लाखाच्या मांडूळाची तस्करी करणाऱ्यास अटक

Karjat Crime Man arrested for smuggling Rs 7 lakh

कर्जत | Crime:  तालुक्यातील नवसरवाडी येथे मांडूळाची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. कर्जतमधील वनपरिक्षेत्र विभागाच्या पथकाने तस्करी करणाऱ्या एकाला रंगेहाथ पकडले आहे.  तीन आरोपी पसार झाले आहेत तर एकास अटक करण्यात आले आहे. पथकाने मांडूळासह मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास श्रीगोंदा येथील वनसंरक्षक रमेश देवखिळे यांनी कर्जत तालुक्यातील नवसरवाडी येथे वन्यजीव मांडूळाची तस्करी होण्याची शक्यता असल्याची गोपनिय माहिती मिळाली. माहिती मिळाल्यात्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबिलवाड, वनरक्षक सुरेश भोसले, आजिनाथ भोसले, दिपक गवारी, वनमजूर किसन नजन यांनी खासगी गाडीने साध्या गणवेशात नवसरवाडी येथे गेले.

या घटनेची खात्री करून घेण्यसाठी बनावट गिन्हाईक म्हणून संबंधीत व्यक्तीकडे गेल्यानंतर ४ व्यक्तींकडे १ मांडूळ असल्याची खात्री पटली. सायंकाळी ५.३० वाजता त्यांना ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे सात लाख रुपये रक्कम देण्याचा व्यवहार केला. त्या अज्ञात ४ व्यक्तीपैकी दोघांनी घरी जाऊन एक मांडूळ आणले. मुद्देमाल मांडूळ व आरोपी यांची खात्री होताच आरोपी विशाल सुर्यभान धनवटे, वय २५ वर्षे, रा. नवसरवाडी ता. कर्जत यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

येथे पहा: हार्दिक पांड्या टॉप सिक्सेस, हेलिकॉप्टर शॉट 6666

तिघे जण मोटारसायकलवरुन पळुन जाण्यात यशस्वी झाले. वनकर्मचाऱ्यांनी मांडूळाचे वजन केले असता ते १.१५ किलो वजनाचे आढळून आले. आरोपीस कर्जत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ७ दिवसांची वनकस्टडी सुनाविण्यात आली आहे.

अधिक तपास उपवनसंरक्षक सुवर्णा माने व सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी गणेश छबिलवाड, वनरक्षक सुरेश भोसले, आजिनाथ भोसले, किशोर गांगर्डे, दिपक गवारी व वन कर्मचारी करीत आहेत.

Web Title: Karjat Crime Man arrested for smuggling Rs 7 lakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here