Home क्राईम संगमनेरात प्रेमप्रकरणातून महिलेवर पाच वर्ष अत्याचार

संगमनेरात प्रेमप्रकरणातून महिलेवर पाच वर्ष अत्याचार

Sangamner Crime News Woman tortured for five years over love affair 

संगमनेर | Crime News: संगमनेर शहरातील एका उपनगरातील महिला व मोहिनी नगर परिसरातील तरुण या दोघांमध्ये भाजी विकत असताना मैत्री झाली. मैत्रीतून प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर त्यानी एकमेकांशी लग्न करण्याचे ठरविले. मात्र तरुणाने पाच वर्ष वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करून लग्नास नकार दिल्याचे समोर आले आहे. ही घटना १३ ऑगस्ट २०२१ पूर्वी घडली.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून किरण बाबासाहेब खांडरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत महिला आणि तिचे पती यांच्यातील भांडण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे पिडीत महिला उपजीविकेसाठी भाजीपाला विकण्याचे काम करते. तिची ओळख ही किरण खंडारेसोबत झाली. त्याने या महिलेसोबत लगट केली आणि मैत्रीचे संबध प्रस्थापित केले. हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात रुपांतर झाली.

येथे पहा: हार्दिक पांड्या टॉप सिक्सेस, हेलिकॉप्टर शॉट 6666

पिडीत महिला ही तिच्या नवरयापासून पोटगीसाठी लढत आहे. त्यामुळे किरण तिला ,म्हणाला की, तुझा त्याच्यापासून घटस्फोट झाला की, मी तुझ्यासोबत लग्न करतो. असे म्हटल्यावर एकमेकांचा विश्वास वाढला. पिडीत महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. तिचे शिक्षण आणि लग्न करून देण्याचा शब्द त्याने तिला दिला. त्यामुळे किरण हा राजरोसपणे त्या महिलेकडे जात होता, त्यांच्यात शरीरसंबध होत होते. त्यातून पिडीत महिला ही चार वेळा गरोदर राहिली होती. १४ जुलै २०२१ रोजी या दोघांना घरच्यांनी रंगेहाथ पकडले होते. एका महिन्यानंतर या महिलने लग्नाची विचारणा केली मात्र त्याने नकार दिला असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Sangamner Crime News Woman tortured for five years over love affair 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here