Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
राहुरी | Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी परिसरातील विवाहित तरुणाचा राहता तालुक्यात अपघात झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघात हा दिनांक १७ रोजी मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला.
वैभव शेटे वय २४ रा. शेटेवाडी देवळाली प्रवरा असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. वैभव शेटे हा राहता येथे कामानिमित्त मित्राकडे गेले असता मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वैभव शेटे हा दुध वितरक वाहनावर चालक म्हणून काम करीत असे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ व सहा महिन्याची मुलगी असे कुटुंब आहे.
याबाबत राहता पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालाकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेने शेटेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Young man killed in unidentified vehicle Accident