Home Suicide News आंब्याच्या झाडाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

आंब्याच्या झाडाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

Suicide by strangling a mango tree  

श्रीरामपूर | Suicide: आंब्याच्या झाडाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे घडली आहे. निल माधवराव गायकवाड (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनने परिसरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत कृष्णा सोन्याबापु गायकवाड (वय 19 रा. जिरेवाडी ,निपाणी वडगाव ,ता.श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 75/2021 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

अनिल गायकवाड यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवार हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Suicide by strangling a mango tree  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here